ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकारी महोदया सिंधुदुर्ग यांच्याशी बैठक संपन्न झाली.
दिनांक 30/12/2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचेबरोबर कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची सहविचार सभा ओरोस जि सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये श्रीमती तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे समवेत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत –
१) कास्ट्राईब कर्मचारी संघटनेकडून रिक्त पदांचा आढावा घेऊन या रिक्त पदांचा अनुशेष भरावा .
२) अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्यात यावी.
३) पदोन्नतीतील अनुसूचित जाती आणि जमातीचा अनुशेष दूर करावा .
४) कर्मचाऱ्यांना ३ लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा.
५) नगर पंचायत व नगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे .
या आणि अशा अनेक मागण्या करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात १००% अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या बद्दल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.
कास्ट्राईब महासंघाचे राज्य अध्यक्ष आदरणीय नामदेव कांबळे साहेब यांनी उपस्थित अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले बैठकीमध्ये मच्छिंद्र सुकटे (उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग) यांनी उपस्थितांचे स्वागत केले व विविध विषयावर चर्चा सुरु झाली. साहेबांनी आपल्या कार्यालयात पदोन्नती चे काम पूर्ण केल्याचे सांगितले. बिंदू नामावली याप्रमाणे रिक्त पदे भरली जातील असे सांगितले.
मागासवर्गीयांच्या अन्यायकारक बदल्या होऊ नये अशी सूचना नामदेवराव कांबळे यांनी दिली.
शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी १५ मार्चच्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होणार व त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.आपण ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती प्रतिभा वैराळे , जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने सुधीर तांबे ( जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना), संजीव मोहिते (उपाध्यक्ष शिक्षक संघटना), कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, व्ही. टी. पंडीत विस्तार अधिकारी (कृषी आदि हजर होते.
शेवटी कास्टाईब शिक्षक संघटमेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



