सावंतवाडी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित विभागीय थाई बॉक्सिंग स्पर्धा 2025- 2026 जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या सहकार्याने ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाई, सातारा येथे आयोजित करण्यात आल्या. यामध्ये सावंतवाडी शहरातील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार आर्यन सुरेश मोटे हा विद्यार्थी 19 वर्ष खालील वयोगटाखालील 65 किलो वजन गटामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राज्य स्तरीय स्पर्धा श्री लक्ष अकॅडमी सैनिक पॅटर्न स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मणेराजुरी, जिल्हा सांगली या ठिकाणी पार पडणार आहे. आर्यन याच्या या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेच्या वतीने तसेच महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



