रुग्णांची हेळसांड अन् गैरसोय झाल्यास गंभीर दखल घेऊ! ; माजी खासदार विनायक राऊत यांनी वैधकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना झापले.

सिंधुदुर्गनगरी : येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, प्रशिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांना सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने हे महाविद्यालय झाले. मात्र रुग्णांची सेवा होण्याऐवजी अनेक रूग्नाना गोव्याला पाठविण्याचे चाललेले प्रकार आणि होणाऱ्या गैरसोयी यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बदनामी होत आहे, हे अत्यंत खेदजनक असून असे प्रकार कृपया थांबवा. अन्यथा आम्हाला त्याची गंभीर दखल घेऊन आंदोलनासारखा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथे वैद्यकीय महाविद्यालयात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांची माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन येथील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांची होणारी गैरसोय तसेच सोयीसुविधा याशिवाय रुग्णांची होणारी हेळसांड, तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे अनेक रुग्ण साध्या साध्या गोष्टीसाठी गोव्याला पाठविले जातात हे जिल्ह्याच्या दृष्टीने शोभनय नाही. रत्नागिरी येथील सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे मिळालेली एक महिला गरोदर असल्याचे येथील डॉक्टरांनी निदान करत तिला अचानक गोवा येथे पाठविले. परंतु त्या महिलेच्या पोटात बाळ नसून अक्षरशा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गोवा येथील डॉक्टरांकडून दाखविण्यात आलेला हा हास्यस्पद प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याला शोभनीय नाही. त्यामुळे आपण एक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून येथील रुग्णांची होणारी गैरसोय प्रत्यक्षात भेटी देऊन तेथील डॉक्टरांकडून होणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली पाहिजे. परंतु कोणतीही गंभीर दखल आपल्याकडून होत नाही. रुग्णांची अनेक वेळा हेळसांड होते. अपघाताचा पेशंट असो किंवा साध्या तापाचा त्याला उपचार मिळत नाहीत. अशा अनेक तक्रारी वाढत असून रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक रिक्त पदे असताना आपण ती का भरत नाहीत?, याबाबत शासनाकडे योग्य ती मागणी करा. आम्ही आरोग्य विभागाकडे मंत्र्यांकडे दाद मागू. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड होता कामा नये किंवा येथील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांची ही गैरसोय होता कामा नये. जर असे प्रकार कायम सुरू राहिल्यास आम्हाला त्याची गंभीर दखल घेऊन उद्याच्या निवडणुकीनंतर आंदोलनासारखा पवित्रा उचलावा लागेल, असा इशाराच माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles