नेमळे शिक्षण संस्थेच्या पुरस्कारांचे २७ जानेवारी रोजी वितरण.

सावंतवाडी : नेमळे शिक्षण संस्थेच्या पुरस्कारांचे २७ जानेवारी रोजी वितर : नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवर्य कै. ज.भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार, कै. प्रमिला शिवराम जाधव आदर्श शिक्षिका पुरस्कार व कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ‘वार्षिक पारीतोषिक’ वितरण सोहळा मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. शाळेच्या बालाजी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कांराचे वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सावंतवाडी संस्थानाचे श्रीमंत युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नेमळे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं. १(ता. वेंगुर्ला) उपशिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर झाला आहे. कै. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सरस्वती विद्यालय, कालेली (ता. कुडाळ) च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शामल चंद्रकांत धुरी यांना जाहीर झाला आहे. तसेच कै. तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘समाजभूषण’ पुरस्कार सावंतवाडी येथील हणमंत कृष्णाजी देसाई उर्फ अण्णा देसाई यांना जाहीर झाला आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ सर व प्राचार्य आर. के. राठोड यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles