सावंतवाडी : दारूच्या नशेमध्ये सुनील सलामवाडकर (वय 43,, राहणार- चंदगड, जि. कोल्हापूर) नामक मोटरसायकल चालकाने रॉंग साईडने येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली डोक्यात हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. परंतु कारचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलून घेतले व सदर अपघातग्रस्त व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.



