आरोंद्यात शर्वाणी गांवकर मैदानात उतरल्यावर सगळी गणिते कोलमडली!

सावंतवाडी  : तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार शर्वाणी गांवकर यांनी संपूर्ण राजकीय चित्रच पालटून टाकले आहे. मैदानात उतरल्यापासूनच गावकर यांचे पारडे ठळकपणे जड होत चालले असून महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

आरोंदा मतदारसंघात सुरुवातीला असलेली बहुकोनी लढत आता स्पष्टपणे ‘महायुती विरुद्ध शर्वाणी गांवकर’ अशीच होताना दिसत आहे. अमेय आरोंदेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र अधिकच स्पष्ट झाले असून, शिवसेना (महायुती) उमेदवार सुदन कवठणकर यांच्यासमोर खऱ्या अर्थाने आव्हान उभे ठाकले आहे ते गावकर यांचेच.
भाजपमधील अस्वस्थता, अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा थेट लाभ शर्वाणी गांवकर यांना मिळत असून, अनेक ठिकाणी भाजपचे पारंपरिक मतदार खुलेपणाने गावकर यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. माजी सभापती म्हणून केलेल्या कामांची चर्चा, विकासाभिमुख भूमिका आणि गावागावांतून मिळणारा प्रतिसाद पाहता ही लढत कागदावर तिहेरी असली तरी वास्तवात एकतर्फी होत चालली आहे, मतदारांचा रोख स्पष्टपणे शर्वाणी गांवकर यांच्याकडे वळलेला दिसतो. त्यामुळे आरोंदा मतदारसंघात ‘अपक्ष’ हा शब्द दुय्यम ठरत असून ‘गावकर फॅक्टर’ हेच निर्णायक सूत्र बनले आहे.
सध्या आरोंद्यात “काम पाहून मतदान” हा सूर अधिक गडद होत असून, पक्षांपेक्षा व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देणाऱ्या मतदारांनी शर्वाणी गांवकर यांना आघाडीवर आणून ठेवले आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी आरोंद्यातून राजकीय धक्का देणारा कौल बाहेर पडण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.
एकूणच, आरोंदा मतदारसंघात सत्ता नव्हे तर ताकद बोलते आहे आणि ती ताकद सध्या शर्वाणी गांवकर यांच्या बाजूने उभी आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles