जितेंद्र गावकर प्रचारात जोरदार आघाडीवर! ; पंचायत समितीचं मैदान मारण्याच्या दिशेने ठाम पाऊल.

सावंतवाडी :  तालुक्यातील माजगाव पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गावकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. माजगाव, वेत्ये आणि सोनुर्ली या तिन्ही गावांमध्ये मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.


प्रचारादरम्यान गावागावात नागरिक स्वतःहून पुढे येत असून,
“जनतेच्या मनातील खरा उमेदवार म्हणजे जितू गावकर”
अशी भावना उघडपणे व्यक्त होत आहे.

 


साधेपणा, सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि थेट जनसंपर्क यामुळे जितेंद्र गावकर यांची लाट स्पष्टपणे दिसून येत असून ‘मैदान मारणारच’ अशी चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीत माजगाव परिसराचं राजकारण ढवळून निघालं असून, अपक्ष उमेदवार म्हणून जितेंद्र गावकरांनी निवडणूक अधिक चुरशीची केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles