सावंतवाडी : माध्यमिक अध्यापक संघ व माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत इ.८ वी ते १०वी मोठ्या गटात कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्तची कु.माधुरी महेश राऊळ हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इन्सुली हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत तीचा रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थीनीला प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत,सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे,प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.