सावंतवाडी : तालुक्यातील कोलगांव – पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबुराव चव्हाण यांची फेरनिवड झाली असून उपाध्यक्ष पदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांची निवड झाली आहे.
यंदा पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे दहावे वर्ष असून विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व लोकप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
मंडळाच्या सचिव पदी आनंद चव्हाण तर कार्याध्यक्षपदी सरकारी वकील स्वप्नील कोलगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सहसचिव पदी रवींद्र चव्हाण खजिनदारपदी सदानंद चव्हाण सहखजिनदारपदी अमोल चव्हाण तर सदस्यपदी संतोष चव्हाण योगेश चव्हाण गौरेश चव्हाण आणि मार्गदर्शक म्हणून पत्रकार सागर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे
नवसाला पावणारी देवी दुर्गा माता अशी ख्याती असलेल्या या कोलगाव पांडवनगगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने यंदा रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यातमध्ये दररात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे तर याशिवाय गरबा, दांडिया रास खेळ होणार आहे.याशिवाय सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण यांनी दिली.