‘तो’ बुवा १, २ नव्हे चक्क ‘१२ मतीचा’! ; कोलगावात वातावरण झालं टाईट, कायदा करणार का फाईट?, ग्रामस्थांचा सवाल.

सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद हालचालींनी खळबळ उडवून दिली आहे. थेट बारामतीहून आलेल्या एका संशयास्पद ‘बुवाला’ भाजपचे उमेदवार महेश सारंग आणि संतप्त ग्रामस्थांनी घेरले अन् एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा बुवा कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट महेश सारंग यांच्या कोलगाव येथील निवासस्थानाबाहेर धार्मिक पुस्तकांचे पठण करत असल्याचे आढळून आले. या संशयास्पद हालचालींवर कोलगावचे उपसरपंच तथा महेश सारंग यांचे लहान बंधू दिनेश सारंग यांचे लक्ष गेले, आणि त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना सतर्क केले. ग्रामस्थांनी बुवाला घेरून झाडाझडती घेतल्यानंतर तो फोर व्हिलरने बारामतीहून कोलगावात आल्याचे निष्पन्न झाले.
निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे बाहेरगावचा बुवा थेट उमेदवाराच्या निवासस्थानी घुसतो, हे केवळ योगायोग आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून बुवाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र याच वेळी आणखी गंभीर बाब समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोलगाव परिसरात अनोळखी तरुणांची टोळी फिरत असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहेत. या टोळीमागे कोणाचा हात आहे? कुणाच्या आशीर्वादाने ही घुसखोरी सुरू आहे? असा संशय अधिकच बळावत आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक गावाच्या सीमेवर निवडणूक आयोगाचे पथक तैनात असतानाही अशा संशयास्पद व्यक्ती आणि टोळ्या गावात शिरतात कशा? हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. पोलिसांची गस्त सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणावरही ठोस कारवाई होताना दिसत नाही, त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार महेश सारंग विरुद्ध अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा अशी हाय-व्होल्टेज लढत सुरू असताना, अशा प्रकारच्या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अनोळखी तरुणांची टोळी आणि बारामतीहून आलेल्या संशयास्पद बुवाच्या घुसखोरीने कोलगावात भीती, संशय आणि संतापाचे वातावरण दाटले आहे.
निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles