आरोंदा मतदारसंघात शर्वाणी गांवकर ठरणार ‘जायंट किलर’ ; जनतेतून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दमदार विजयाकडे वाटचाल.

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील आगामी लढत राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून, या लढतीत अपक्ष उमेदवार शर्वणी गावकर या ‘जायंट किलर’ ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सौ. गावकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारपुढे या निवडणुकीत जोरदार आव्हान उभे राहिले असून, गावागावात शर्वणी गावकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सामान्य जनतेशी असलेला थेट संवाद आणि स्वच्छ प्रतिमेमुळे शर्वणी गावकर या मतदारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. विशेषतः तरुण, महिला आणि परिवर्तनाची अपेक्षा असलेला वर्ग त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे चित्र आहे. याउलट प्रतिस्पर्धी उमेदवार या लढतीत बचावात्मक भूमिकेत आल्याचे जाणकारांचे मत आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात एकतर्फी विजयाची शक्यता शर्वणी गावकर यांच्या बाजूने झुकत असून, आरोंदा मतदारसंघात मोठा उलटफेर घडणार का?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर ही लाट अशीच कायम राहिली, तर आरोंदा निवडणूक इतिहासात अपक्ष ‘जायंट किलर’चा नवा अध्याय लिहिला जाणार, हे निश्चित!

आरोंदा मतदारसंघात सुरुवातीला असलेली बहुकोनी लढत आता स्पष्टपणे ‘महायुती विरुद्ध शर्वाणी गांवकर’ अशीच होताना दिसत आहे. अमेय आरोंदेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र अधिकच स्पष्ट झाले असून, शिवसेना (महायुती) उमेदवार सुदन कवठणकर यांच्यासमोर खऱ्या अर्थाने आव्हान उभे ठाकले आहे ते गावकर यांचेच. भाजपमधील अस्वस्थता, अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा थेट लाभ शर्वाणी गांवकर यांना मिळत असून, अनेक ठिकाणी भाजपचे पारंपरिक मतदार खुलेपणाने गावकर यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. माजी सभापती म्हणून केलेल्या कामांची चर्चा, विकासाभिमुख भूमिका आणि गावागावांतून मिळणारा प्रतिसाद पाहता ही लढत कागदावर तिहेरी असली तरी वास्तवात एकतर्फी होत चालली आहे.

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, माजी जिल्हा परिषद सदस्य शर्वाणी गावकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरताच संपूर्ण लढतीचे चित्र पालटले आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारली गेली असली, तरी गेल्या पाच वर्षांतील ठोस विकासकामांच्या जोरावर गावकर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. त्यांच्या घरोघरी सुरू असलेल्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महायुतीने ऐनवेळी शर्वाणी गावकर यांच्याऐवजी सुदन कवठणकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आरोंदा मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली होती. निष्ठावान कार्यकर्ती असूनही डावलल्याने कोणतीही तडजोड न करता गावकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला. हा निर्णय सध्या महायुतीसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असलेला भक्कम जनसंपर्क, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर केलेली कामगिरी आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली संवेदनशील भूमिका यामुळे त्यांच्या प्रचाराला वेगळी धार मिळाली आहे. प्रचारादरम्यान शर्वाणी गावकर यांनी, “आरोंदा मतदारसंघातील अनेक प्रश्न मी जिल्हा परिषद सदस्य असताना मार्गी लावले. जनतेसाठी सातत्याने काम केले असून माझ्या कामाची खरी पावती जनता देईल,” असा विश्वास व्यक्त केला.

“ही लढत केवळ राजकीय नसून नियोजनबद्ध, पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासासाठीची आहे. जनतेचा वाढता पाठिंबा पाहता माझा विजय निश्चित आहे,” असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.

शर्वाणी गावकर यांच्या प्रचारात जिल्हा परिषद उमेदवार उत्साह परब, माजी सरपंच बबन सातोसकर, आबा धुरी, सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, रुपेश साळगावकर, प्रसाद मांजरेकर, नाना नाईक, उत्तम शिरोडकर, गुरुनाथ गवंडी, जयराम मसुरकर, लक्ष्मण खोत, सुजित सर देसाई, वेदांत साळगावकर, स्नेह पेडणेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी होत असून गावागावात ‘शर्वाणी गावकरच हवा’ अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

एकंदर अपक्ष शर्वाणी गावकर यांनी घेतलेली आघाडी पाहता आरोंदा मतदारसंघातील ही निवडणूक आता एकतर्फी न राहता अत्यंत निर्णायक आणि प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles