शावियर फर्नांडिस यांच्या प्रचाराचा झंझावात!, इन्सुली मतदारसंघात महायुतीची लाट!

सावंतवाडी : इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शावियर फर्नांडिस यांच्या प्रचाराने संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला आहे. डेगवे, इन्सुली, काससह सर्वच गावांमध्ये त्यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत असून विरोधकांची धावपळ उडाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
आबालवृद्ध, युवक-युवती, महिला वर्गापर्यंत सर्वच स्तरातून शावियर फर्नांडिस यांचे जंगी स्वागत होत असून “हा उमेदवार आमचाच” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. तरुण, तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने मतदारांनी थेट “शंभर टक्के विजय निश्चित” असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
डेगवे, इन्सुली, कास यांसह मतदारसंघातील प्रत्येक गावात शावियर फर्नांडिस यांनी प्रत्यक्ष भेटी, संवाद व प्रचार दौऱ्यांतून आपला विकासाचा ठोस अजेंडा जनतेसमोर मांडला. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी दिलेले स्पष्ट आश्वासन मतदारांना भावल्याने महायुतीच्या प्रचाराला वेगळीच धार मिळाली आहे.


एकीकडे शावियर फर्नांडिस यांच्या प्रचाराची लाट दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे विरोधकांचा आवाज दबत चालल्याचे चित्र आहे. इन्सुली मतदारसंघात आता “फर्नांडिस विजय अटळ” अशीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles