अभिमानास्पद! – पुणे विद्यापीठातील एज्युकॉनक्लेव्हसाठी पांडुरंग काकतकर यांची निवड! ; ‘ग्रामीण भागातील शिक्षणाची वास्तविकता व आव्हाने’ चर्चासत्रासाठी विशेष निमंत्रित.

सावंतवाडी : केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज क्लस्टर व सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एज्युकॉनक्लेव्ह कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात विविध राज्यांचे शिक्षणतज्ञ,धोरणकर्ते व स्टेम (STEM) म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथिमॅटिकसमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ व विज्ञानप्रेमी उपस्थित होते.

या कार्यक्रमातून देशात विज्ञानाचा प्रचार प्रसार तसेच आधुनिक शिक्षणात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या एन.जी.ओ.ना एकाच छताखाली आणून त्या संस्थांच्यामाध्यमातून शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने आणि त्यावर उपाय योजना यांचा लेखजोगा मांडण्यात आला.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे उपकुलगुरु प्रा.डॉ.सुरेश गोसावी, आयुकाचे संचालक डॉ. रघुनाथन श्रीआनंद, आणि  पुणे क्लस्टरच्या सीईओ डॉ. प्रिया नागराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत विविध एन.जी.ओ.च्या प्रतिनिधींनी आपआपल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यात शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर,गेमीफिकेशन (खेळातून विज्ञान), कृतीयुक्त अध्यापन यांची प्रात्यक्षिके यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे शिक्षणातील समस्यांबाबत विविध स्तरातील तज्ञांची मते मांडण्यासाठी घेण्यात आलेले चर्चासत्र ” *भविष्यातील वर्गखोल्या वास्तविकता,आव्हाने आणि जबाबदाऱ्या* यात अगस्त्या फाउंडेशन, कुप्पमचे रिजनल एक्सपरीयन्स लीडर, रमेश हितनल्ली,ज्ञानसेतू ,ज्ञान प्रबोधिनी पुणेचे,कोऑर्डिनेटर आशुतोष भुजबळ, सावरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ,कार्तिक बालसुब्रमण्यम,पिंपरी चिंचवड सायन्स सेंटरच्या,सीईओ,
श्रद्धा कंपारिया,कम्युनिटी यंगेजमेंट अँड बिलाँगिंगस,एपीएसीच्या एव्हिपी, सिनियर मॅनेजर,रिचिका पदुबिद्री तसेच ग्रामीण भागातील शिक्षणाची वास्तविकता समजून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोनुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांना विशेष उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आयुका,पुणेचे संचालक समीर धुर्डे यांच्या अभ्यासपूर्ण, खुमासदार आणि समयसूचक प्रश्नांतून शिक्षणाच्या विविध अंगांचे कंगोरे उलगडले त्यास उपस्थित शिक्षणप्रेमींनीही आपली मते मांडून भरभरून दाद दिली.
आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी” *टेक व्हिजन रोबोटिक्स* ” प्रदर्शन तसेच नाविण्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा प्रसार या उद्दिष्टाने घेतलेल्या या उपक्रमासाठी आयसरचे शास्त्रज्ञ मिलिंद वाटवे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच आयआयटी मुंबईचे प्रा.प्रसादबोकील, सी.जी. पाठशालाच्या शुभा कुलकर्णी, अगस्त्याचे पराग सावंत, महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी,विज्ञान आश्रमच्या कोमल राऊत,आयुकाचे रुपेश लबदे,यू.एस.एफ.चे अक्षय बांदेकर या प्रतिनिधींनी आपआपल्या संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल सादरीकरण केले.
एज्युकॉनक्लेवचे नियोजन पी.के.सी.च्या प्रकल्प प्रमुख गायत्री क्षीरसागर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शीतल नागपुरे,श्रेयस खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles