सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रयाण महिला टुरिझम संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनारोजीन लोबी, अध्यक्षा अपर्णा कोठावळे, संचालक भारती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शुभांगी सुकी, दिपाली सावंत, ज्योत्स्ना सुतार, कमल मांडवकर, प्रतिमा नाटेकर, सुनीता दापले, लक्ष्मी मेस्त्री, सुनीता तोगरे, उल्का पालव, प्रतिभा गवळी, सत्यवती गवडे, अंजु डिसोझा, निशा गवळी, स्वप्नाली गाडे, मिलाग्रीन डँडस, आरती खोराखडे, साजिदा रेडकर, सुप्रिया गवडे, सवर्शीला कृपवडेकर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्ष अनारोजीन लोबी, अध्यक्ष अपर्णा कोठावळे आणि संचालक भारती मोरे यांनी आपले विचार व्यक्त करत मा. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला व श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या श्रद्धांजली कार्यक्रमातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.



