सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथील मतदान केंद्र क्रमांक 34/13 वर नववधू माधवी दाभोलकर यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून त्या थेट लग्नमंडपाकडे रवाना झाल्या. नागरिकत्वाची जाणीव ठेवत त्यांनी मतदानाला प्राधान्य दिल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.



