सावंतवाडी : माजगाव पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार जितेंद्र (जितू) गांवकर हे वावटळीसारख्या मताधिक्यांनी विजयी होणार असून, सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी जमीनदोस्त करत इतिहास घडवणार, असा ठाम विश्वास वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी दिला आहे.
“हा फक्त विजय नसेल… हा जनतेचा स्फोट असेल! संपूर्ण मतदारसंघात विरोधक धुळीस मिळणार आणि सर्वाधिक लीड जितू गांवकर यांनाच मिळणार,” असा दावा श्री.गावडे यांनी केला आहे.
दरम्यान, “आता शब्द नाही, मतांनी उत्तर देण्याची वेळ आली आहे!, लोकशाही मजबूत करा, सर्वांनी मतदान करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर यांनी मतदारांना केले आहे.



