कुडाळ : तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील श्री लक्ष्मी नारायण दूध व्यावसायिक मर्यादित दुग्ध संस्था यांच्यावतीने तुळसुली येथील गोमाता संरक्षित गोशाळा येथे आश्रयास असलेल्या गाईंना पशुखाद्य कडबा-कुट्टी मोफत प्रदान करण्यात आली.
बेकायदेशीर वाहतूक व मांस विक्रीसाठी नेल्या जाणाऱ्या गोमातांचे संरक्षण व्हावे, त्या सुरक्षितपणे जगाव्यात या उदात्त हेतूने तुळसुली येथील गोशाळेत त्यांचे संगोपन केले जाते. या गाईंच्या चारापाण्याची व्यवस्था सुलभ व्हावी, याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून श्री लक्ष्मी नारायण दुग्ध संस्थेच्या सर्व सभासदांनी एकमताने पुढाकार घेत हा उपक्रम राबविला.
संस्थेमार्फत रु. १०,०००/- किंमतीची कडबा-कुट्टी गोशाळेतील गोपालक श्री. वारंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. गणपत सखाराम कविटकर, सचिव ॲड. निता सावंत – कविटकर यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.



