✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नंबर एकची मते मिळवले आहेत. तब्बल ६३८१ मतं घेऊन संदीप गावडे यांनी केवळ निवडणूक जिंकलेली नाही, तर सिंधुदुर्गाच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार ठरून त्यांनी इतिहास रचला आहे. संदीप गावडे यांची ही केवळ विजयाची आकडेवारी नाही तर ही आहे रचनात्मक, विकासाभिमुख आणि व्हीजनरी नेतृत्वावर जनतेने उमटवलेले ठाम शिक्कामोर्तब! अत्यंत प्रतिष्ठेची आणि चर्चेची ठरलेली ही लढत संदीप गावडे यांच्या विकासाच्या व्हिजनमुळे एकतर्फी ठरली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार रुपेश राऊळ यांना ३८५५ मते मिळाली. मात्र जिल्ह्यात नंबर वनचा मुकुट संदीप गावडे यांच्याच शिरपेचात रोवला गेलाय.


तसेच मतं मिळविण्याबाबत दुसरा क्रमांक नाटळ–भूतनाथ मतदारसंघातून उमेदवारी केलेले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी प्राप्त केलाय. त्यांनी ६३१३ मते घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. तर हरकुळ बुद्रुक मतदारसंघातून मनोज रावराणे यांनी ५८२८ मते घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार नेतृत्व विक्रांत सावंत यांना ५१४१ मते मिळाली असून त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
दरम्यान हा निकाल स्पष्ट सांगतोय की जनतेने विकासाला कौल दिला आहे आणि संदीप गावडे यांनी इतिहास घडवलाय.



