निरवडे येथील संस्कार नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये रंगला सांस्कृतिक महोत्सव व अवॉर्ड समारंभ!

सावंतवाडी :  दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचलित संस्कार नॅशनल इंग्लिश स्कूल, निरवडे येथे नुकताच सांस्कृतिक उत्सव व गुणवंतांचा अवॉर्ड समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री योगेंद्र मंहतजी, अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अनंत सोहनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार, सागर चव्हाण, प्रिन्सिपल प्रणाली रेडकर, पालक-शिक्षक समिती उपाध्यक्ष संदेश घाडी, माता पालक समिती उपाध्यक्ष सौ. ऋतुजा मुळीक, कला शिक्षक हरी वारंग, चंदन गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन यांनी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

या वेळी बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड एंजेल आग्नेल फर्नांडिस, बेस्ट टीचर अवॉर्ड सौ. रुची रुपेश देसाई, बेस्ट नॉन टीचिंग स्टाफ अवॉर्ड सौ. रेवती माळकर व सौ. दर्शना माळकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच SSC बोर्ड २०२४-२५ मधील गुणवंत विद्यार्थी म्हणून ख़ुशी न्हानू नाईक व दिपेश दत्तप्रसाद परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत आदी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पांगम यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles