सावंतवाडी कोर्टजवळच्या वळणावर संरक्षण भिंत बांधून दुर्घटना टाळावी! ; सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांची मागणी.

सावंतवाडी: साधारण चार वर्षांपूर्वी मोती तलावाच्या काठी मंगळवारचा बाजार भरवला जात होता त्यावेळी एक दुर्घटना घडली होती कोर्टाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या वळणा लगत फूटपाथवर फळ विक्री करत असलेल्या एका फळ विक्रेत्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने त्या फळ विक्रेत्याला खाली नाल्यात उतरून बाहेर काढले व तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच दुर्दैवी निधन झालं. त्याच वेळी रवी जाधव यांनी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी म्हणून नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते परंतु या गंभीर विषयाकडे त्या वेळी पूर्णपणे दुर्लक्ष केला गेला.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेवर विशेष भर देऊन सदर नाल्याची नुकतीच साफसफाई करून घेतली.
काही वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून त्या नाल्यामध्ये कृत्रिम वन्यप्राणी बसवण्यात आले होते त्यामुळे तो भाग पर्यटनाचा ठरला आहे. बाहेरून येणारे पर्यटक व सहलीची मुलं त्या ठिकाणी ते कृत्रिम प्राणी पाण्यासाठी गर्दी करतात अशावेळी कुठच्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सन्माननीय नगरसेवकांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन सहकार्य करावे. सध्या स्थितीमध्ये त्याच ठिकाणी फूटपाथ चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे हाताबरोबर तेही काम करून घेतल्यास पुढे होणारी दुर्घटना टळू शकते.
तसेच शहरात पावसामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत होते या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु वाहनांच्या सततच्या वरदळीमुळे पुन्हा तेथे खड्डे तयार झाले आहे तसेच ठीक ठिकाणी गॅस पायपिंगसाठी रस्ते खोदाईमुळे अपघात होण्याची संभावना आहेच त्याचप्रमाणे सावंतवाडी बाजारपेठेमध्ये धुळीच साम्राज्य होऊन व्यावसायिक त्रस्त झाले आहे तर मोती तलावाचे पाणी पूर्णपणे खराब होऊन पाण्याला दुर्गंध येत आहे या महत्त्वाच्या सर्व विषयांकडे सन्माननीयांनी लक्ष घालावा अशी देखील मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles