सावंतवाडी : माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्यावर आक्षेपार्ह सोशल मीडियावर टीका केल्याचे निदर्शनास आले असता सावंतवाडी खासकीलवाडा येते श्री. उपरकर यांचे समर्थक आशिष सुभेदार व कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत जाब विचारला. यात दोन गटात धक्काबुक्की करण्यात आली. आशिष सुभेदार व कार्यकर्ते यांनी आक्रमक होत टीका करणाऱ्यांना तेथून पळवून लावले. तसेच पुन्हा सोशल मीडियावर श्री उपरकर यांच्यावर चुकीचे टीका केल्यास योग्य तो धडा शिकवू, असा इशारा माजी आमदार उपरकर समर्थक यांनी दिला. तर टीका करताना भान ठेवा. अन्यथा आम्ही देखील उत्तरास प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत, असा इशारा युवा सेना तालुकाप्रमुख श्री. सुभेदार यांनी दिला.
माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना समर्थकांनी शिकविला धडा!
0
86



