सावंतवाडी : सावंतवाडी – बेळगाव रोडवरील माडखोल मेटवाडी येथे पिकअप वाहनातून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप क्रमांक MH09-CU-3958 या वाहनातून तीन बैलांना निर्दयपणे कोंबून, त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा टॅगिंग नसताना भरधाव वेगाने असुरक्षितरीत्या वाहतूक करण्यात येत होती. याशिवाय संबंधितांकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना देखील नव्हता.
या प्रकरणी दस्तगीर इसाक बेपारी, अरुण पांडुरंग गावडे,
गोपाळ विठ्ठल परीट (सर्व राहणार – तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) या तिघांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी तिन्ही बैलांची सुटका करून त्यांना गो-शाळेत दाखल केले असून संबंधित पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.



