दक्षिण आफ्रिकेची विजयी हॅट्रिक! ; न्यूझीलंडचा ७ विकेट्सने धुव्वा!

अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध 7 विकेट्सने जबरदस्त असा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्पर्धेतील 24 व्या सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान त्यांच्या फलंदाजांनी केलेल्या चाबूक बॅटिंगच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17 बॉलआधी 7 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह सलग तिसरा विजय मिळवला आणि न्यूझीलंडच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला.

दक्षिण आफ्रिकेची खास कामगिरी –

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह काही खास विक्रम आपल्या नावावर केले. दक्षिण आफ्रिकेची 2007 नंतर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 150 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच दक्षिण आफ्रिकेने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध विजयाची मालिका कायम ठेवण्यात यश मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा हा न्यूझीलंड विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला.

कॅप्टन एडन मारक्रम विजयाचा हिरो –

डॅरेल मिचेल आणि मार्क चॅपमन या जोडीने पाचव्या विकेटसाठी 23 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली.न्यूझीलंड टीमने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅप्टन एडन मारक्रम याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला. एडन हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला.

दक्षिण आफ्रिकेची कडक सुरुवात आणि धमाकेदार विजय –

एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने 62 धावांची भागीदारी केली. क्विंटन आऊट होताच ही जोडी मोडीत निघाली. डी कॉक याने 20 धावा केल्या. त्यानंतर एडनने रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस आणि डेव्हिड मिलर यांच्यासोबत भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. रायनने 21 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 21 धावांचं योगदान दिलं. तर एडन आणि मिलर ही जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयी करुन नाबाद परतली. मिलरने 24 धावा केल्या. तर मार्करमने 44 बॉलमध्ये 195.45 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 86 रन्स केल्या. एडनने या खेळीत 4 षटकार आणि 8 चौकार लगावले.

दक्षिण आफ्रिकेची सुपर 8 ची प्रतिक्षा कायम –

दरम्यान दक्षिण आफ्रिका सलग 3 सामने जिंकल्यानंतरही सुपर 8 साठी क्वालिफाय झालेली नाही. डी ग्रुपमधील इतर 4 संघ अजूनही सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. त्यामुळे अधिकृतपणे दक्षिण आफ्रिका सुपर 8 साठी पात्र ठरलेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेचं सुपर 8 साठी पात्र होणं औपचारिकता आहे, हे देखील तितकंच खरं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles