– ✍️ संजय पिळणकर
वेंगुर्ला : गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र १ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करताना ४ सुवर्ण, ४ रजत व २ कास्य पदके जिंकून प्रशालेची मान उंचावली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन सर्व यशस्वी विध्यार्थी आणि शिक्षक वर्गाचे शाळा व्यवस्थापन समिती तर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शिवप्रतिमेचे व सरस्वती मातेचे विधिवत पूजन करून व दीपप्रज्वलननाने कार्यक्रमाचे उदघाटन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर,सदस्य सौ इंद्रायणी पडवळ,शिक्षणप्रेमी संजय पिळणकर,दानशूर पालक गुंजन केळुसकर,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर,उपाध्यक्ष सेजल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपस्थीत तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी शिव चरित्रावर आधारित ओजस्वी विचार व्यक्त केले.यापैकी पहिल्या १० विद्यार्थ्यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा संघटक संजय पिळणकर पुरस्कृत भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी शिक्षक मांडे सर, व्हाव्हळे सर,शिक्षिका सौ लीना नाईक,सौ प्रगती आव्हाड आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



