सावंतवाडी : माजी सैनिकांनी जिद्दीने उभारलेल्या हे भवन केवळ एक इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल, असे प्रतिपादन प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक केसरकर यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येथे माजी सैनिकांनी स्वबळावर उभारलेल्या ‘माजी सैनिक भवन’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावारून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सैनिक सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. केसरकर म्हणाले,
शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत असून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी मानवंदना असल्याचेही त्यांनी नमूद केले. मतदारसंघातील विकासकामे आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
या सोहळ्यास वेर्ले व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. माजी सैनिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. शेवटी माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.



