सावंतवाडीत उत्साही वातावरणात शिवजन्मोत्सव साजरा. ; राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवरायांना मानाचा मुजरा!

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग कार्यालयात यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन उत्स्फूर्त वातावरणात करण्यात आले. छत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. छोट्या बालकांची आकर्षक रॅली हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालचमूने सादर केलेले शिवजयंतीचे पोवाडे आणि मर्दानी घोषणांनी उपस्थितांच्या मनात शिवभक्तीचा जागर निर्माण केला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सहसचिव कल्याण कदम, सचिव रामचंद्र कुडाळकर, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, सामाजिक कार्यकर्ते मधुकर तळवणेकर, संघटनेचे प्रवक्ते शिवा गावडे, तालुकाध्यक्ष सचिन गावडे, श्री. शिवानंद हैडगे, अंजली गाडी, अनिल सावंत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात वक्त्यांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. शिवजयंतीचा हा सोहळा शिवप्रेम, ऐक्य आणि राष्ट्राभिमान यांचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles