वेंगुर्ला : दिनांक .१८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिरोडा–रेडी–आरवली मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
या कार्यालयाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका प्रमुख निलेश चमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमास युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर, ओबीसी तालुका प्रमुख प्रविण धानजी, वेंगुर्ला शहर प्रमुख शैलेश परुळेकर, जिल्हा समन्वयक सुधाकर राणे, विभाग प्रमुख नामदेव राणे, अल्पसंख्याक सेल तालुका प्रमुख रफिक बेक, युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शिरोडा शाखाप्रमुख राकेश परब, आरवली शाखा प्रमुख बाळा पेडणेकर, महिला उपतालुका प्रमुख समृद्धी कुडव, संतोष कुडव, रेडी महिला उपविभाग प्रमुख स्नेहा राणे, रेडी महिला शाखा प्रमुख वंदना कांबळी, विनोद कांबळी, युवती सेना उपजिल्हा अधिकारी नंदिनी धानजी, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य शीतल नाईक, अमोल परब, विलास चिपकर, अजित आरोलकर, अशोक नाईक, आबा चिपकर, दाजी गावडे, नारायण गावडे, दिगंबर परब, नंदकुमार परब, लक्ष्मण कांबळी, संजय भानजी तसेच असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्या कार्यालयामुळे शिरोडा–रेडी–आरवली परिसरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हा सोहळा केवळ कार्यालयाच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, शिवसैनिकांच्या एकजुटीचे आणि निष्ठेचे प्रतीक ठरला. परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा ऐतिहासिक क्षण उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.



