हेडलॅण्ड सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात संपन्न.

कुठठाळी (गोवा) : हेडलॅण्ड सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
दैनंदिन जीवनात प्रत्येकाने छत्रपती शिवाजीमहाराज यांचे एखादे दोन तरी गुण आत्मसात केल्यास जीवन सर्वांग सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. आपण कार्यरत असलेल्या कामाच्या ठिकाणी,समाज, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विचार करून कामाला सुरुवात केल्यास अपेक्षित बदल नक्कीच घडेल, असे मत प्रमुख पाहुणे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यानी व्यक्त करत आयोजक प्रा. सुनील शेट व शाळेचे अभिनंदन केले.

(फोटो ओळी : दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भगीरथ शेटये, प्राचार्य मारीया डायस, सुनील शेट, अक्षदा वाडेकर, शिवदास नाईक, झनायडा बारैटो, सिध्दांत पराडकर व इतर मान्यवर.)

सदर कार्यक्रम 19 रोजी शाळेच्या दिपविहार गड येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे भगीरथ शेटये, दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य मारीया डायस, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष सौ. अक्षदा वाडेकर, शिवदास नाईक, नंदा होन्नावरकर, सेंट एन्डरुव शाळेच्या मुख्याध्यापिका झनायडा बारैटो, कार्यक्रम संयोजक प्रा. सुनील शेट उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला भगीरथ शेटये व इतर मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला.


प्रथम भोंसले, देवांश शेटये, भार्गव चौगुले, शशांक पेडणेकर,सिध्दांत पराडकर, निहार परब यांचा भेट वस्तू देवून भगीरथ शेटये यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्राचार्य मारीया डायस यांनी यावेळी आपल्या भाषणात चांगले गुण आत्मसात केल्यास उत्तम जीवन जगता येईल असे मत व्यक्त केले. प्रा. नंदकुमार सातार्डेकर यानी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित राहून सर्वानी सहभाग दर्शवला. यावेळी सिध्दांत पराडकर यानी शिवगरजना सादर करून वाहवा मिळवली.
प्रा. सुनील शेट यानी स्वागत व प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांकडून सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. प्रा. सुदेश गांवकर यानी सूत्रसंचालन केले तर प्रा. सौ.मनिषा नाईक यानी आभार मानले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles