सावंतवाडीत दुचाकी चोरी प्रकरणी आरोपी अटकेत! ; वाहन केलं जप्त.

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव खोतवाडा येथून चोरीस गेलेली दुचाकी सावंतवाडी पोलिसांनी हस्तगत केली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी आदित्य गोविंद खोरजूवेकर (वय 19 वर्षे, रा. माझगाव खोतवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9.30 ते दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभी असलेली सुझुकी कंपनीची अ‍ॅक्सेस दुचाकी (क्रमांक MH 07 AW 1048) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करीत आहेत. तपासादरम्यान पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर व पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रवी शंकर लाखे (वय 40 वर्षे, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याने ही दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न केले.
त्यानुसार पोलिसांनी सावंतवाडी शहरातून आरोपीच्या ताब्यातील सदर दुचाकी जप्त केली असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या कारवाईसाठी पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे व सुरेश पाटील यांनीही सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles