सावंतवाडी जि. प. शाळा क्रमांक ६ ला ISO मानांकन प्रदान! ; वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

सावंतवाडी : शहरातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंत नंबर ६  मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व ISO ( 9001:2015)  मानांकन प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विविध स्पर्धा- परिक्षांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले. शाळेस कंपाउंड वॉल बांधून देऊन सहकार्य करणारे उद्योजक राजू भालेकर, नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.दिपाली भालेकर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त  सुनील करडे, राज्यस्तरीय जिजाऊ माता पुरस्कार प्राप्त शाळेच्या शिक्षिका श्रीम. सायली लांबर, स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या श्रीम .रेखा कांबळे व श्रीम. रीया पाल या सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएस मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेला ISO (9001 : 2015 )मानांकन प्रदान करण्यात आले.
संध्याकाळी स्वच्छतादूत आणि युवा प्रबोधनकार श्री सगुण जाधव यांनी *संत गाडगेबाबा हा एक पात्री नाट्य प्रयोग* सादर करुन समाजप्रबोधन केले.तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
अशा विविधरंगी कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान. श्रीमती दिपाली भालेकर ( सभापती महिला व बालकल्याण समिती, नगरपरिषद सावंतवाडी ) माननीय श्री राजू भालेकर (भालेकर खानावळचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते), मान. श्रीमती सविता परब मॅडम ( गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी) मान. श्री सहदेव चव्हाण (आयएसओ समन्वयक कोकण विभाग) मान. श्री कमलाकर ठाकूर सर(केंद्रप्रमुख सावंतवाडी) माननीय श्री दिलीप भालेकर( शिक्षण तज्ञ), माननीय श्री संतोष तळवणेकर (जिल्हाध्यक्ष राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग), मान. श्री सतीश धुमाळे सर (मुख्याध्यापक वि.स. खांडेकर हायस्कूल ),मान. श्री. पोळ सर प्राचार्य (अभिनव ॲकॅडमी सावंतवाडी) असे विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आरोग्य व क्रीडा समिती सभापती मान.श्री सुधीरजी आडीवरेकर  यांनी दहा हजार रुपये देऊन आर्थिक सहकार्य आणि शुभेच्छा दिल्या .शिक्षणतज्ज्ञ श्री.दिलीप भालेकर यांनी पाच हजार रुपये आणि पालकवर्गांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा श्रीम. पूनम तुयेकर, दिलीप भालेकर, श्रीम. ईश्वरी तेजम,  गुरुप्रसाद तेजम, श्रीमती जान्हवी वारीक, श्रीम.अश्विनी गावडे, श्रीम. दिपा गावडे, कु. मयुरेश सुतार, शिक्षकवृंद केशव जाधव, श्रीम. सायली लांबर, श्रीम. रेखा कांबळे,  श्रीम.रीया पाल यांनी प्रयत्न केलेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles