निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!

नवी दिली : दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्याअभावी त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयानंतर केजरीवाल भावूक झाले आणि त्यांनी याला ‘खोटी केस होती, सत्याचा विजय झाला’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘माझ्या आयुष्यात केवळ प्रामाणिकपणा कमावला आहे’ असे नमूद केले.

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपपत्रात अनेक त्रुटी होत्या आणि कोणताही साक्षीदार किंवा जबाब सिद्ध होत नाही. सीबीआय सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध करू शकली नाही. केजरीवाल यांचे नाव कोणताही ठोस पुरावा नसताना जोडले गेले होते. मात्र, सूत्रांनुसार, सीबीआय या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहे. या प्रकरणात एकूण 23 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles