मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान ,कला व कार्यानुभव प्रदर्शन! ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये विज्ञान दिनानिमित्त नुकतेच विज्ञान, कला व कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. सी .व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच डॉ. सी. व्ही. रमण यांच्या वैज्ञानिक योगदानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी संस्थेचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे व प्रकल्प वाखाणण्याजोगे होते. सस्टेनेबल ॲग्रीकल्चर, वेस्ट मॅनेजमेंट, ग्रीन एनर्जी ,इमर्जिंग टेक्नॉलॉजी, रिक्रिएशनल मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, वॉटर कंजर्वेशन अँड मॅनेजमेंट इत्यादी विषयांवर विविध लक्षवेधी विज्ञान, गणित प्रकल्प व उपकरणे मांडण्यात आली होती.

नॅनो बबल टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल ॲग्रीकल्चर, स्मार्ट सिटी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ड्रीप इरिगेशन ,औषधी वनस्पती, वॉटर प्युरिफायर ,हेल्दी फूड ,मॉडेल ऑफ डॅम ,ग्रीन सायकल, स्मोक प्युरिफायर, इकोसिटी, हायड्रोफोनिक्स ,बायो फर्टीलायझर, मल्टीलेयर फार्मिंग, फायर डिटेक्टर, ईव्ही सायकल चार्जिंग, ॲक्वेटिक वेस्ट मॅनेजमेंट, हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्लाइंड शुज, पॅरिस्कोप, सेंसर डिटेक्टर ,पायथागोरस थेरम ,अंकांचा खेळ, अपूर्णांक, ॲंगल्स, टॉवर ऑफ हॅनाॅन, स्क्वेअर ॲंन्ड क्यूब्ज इत्यादी प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली व्यक्ती चित्रे ,वस्तू चित्रे, स्थिरचित्रे ,निसर्ग चित्रे ,देखावे तसेच तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या.यामध्ये वूलन फ्लॉवर, वूलन की चेन ,ग्लास बॉटल पेंटिंग्ज ,वॉल हॅगिंग, पेन स्टँड, ग्लास पेंटिंग्ज ,फ्लॉवर पॉट,वूलन आर्ट, क्ले आर्ट, हॅंकरचीफ,कॅनव्हास पेंटिंग ,नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू ,करवंटी पासून शोभेच्या वस्तू ,फोटो फ्रेम,एम्बॉस पेंटिंग ,ग्लास पेंटिंग, थ्रीडी पेंटिंग, पेपरवेट,स्टोन आर्ट इत्यादी विविध कलाकृती प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठी देखील मांडल्या होत्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यास व्यासपीठ मिळाले त्याचप्रमाणे कलाकौशल्यावर आधारीत आर्थिक स्वावलंबनास चालना मिळाली.तसेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान ,पर्यावरण , सामाजिक प्रबोधन या विषयांवर आधारीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पालकांनी विज्ञान, कला व कार्यानुभव प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षिका श्रीम. फरजाना मुल्ला, श्रीम. साक्षी सावंत, श्रीम. अस्मिता परब, श्रीम.अर्चिता सुभेदार, कुलदीप कालवणकर, श्रीम. मानसी सावंत, श्रीम. प्रणिता मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles