मोती तलावाचे होणार ‘इको-फ्रेंडली’ सुशोभीकरण ! : ॲड. अनिल निरवडेकर यांची माहिती. ; ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे सावंतवाडी पालिकेतर्फे अभीष्टचिंतन! ; प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिल्या शुभेच्छा!

सावंतवाडी : मराठी पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले व त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

या छोटेखानी सोहळ्याला पत्रकार संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी अभिमन्यू लोंढे, सचिव विनायक गावस, माजी अध्यक्ष विजय देसाई, माजी सदस्य सागर चव्हाण, सदस्य उमेश सावंत, नरेंद्र देशपांडे, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

मोती तलावाचे होणार ‘इको-फ्रेंडली’ सुशोभीकरण !
वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहराच्या पर्यावरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली.

दरम्यान मोती तलावाच्या काठी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाबाबत त्यांनी खालील मुद्दे मांडले-

तज्ज्ञांचा सल्ला –

तलावाकाठी कोणती झाडे लावावीत, यासाठी ‘वृक्ष संवर्धन समिती’चा तांत्रिक सल्ला घेतला जाणार आहे.

तलावाचे संरक्षण – 

तलावाच्या पायऱ्या, कठडे आणि फुटपाथची कमीत कमी धूप होईल, अशाच प्रजातींची निवड केली जाईल.

जैवविविधता –

चिमण्या, इतर पक्षी आणि फुलपाखरांचा किलबिलाट वाढेल अशा पर्यावरणपूरक झाडांना प्राधान्य दिले जाईल.

पर्यटकांची सोय –

येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना सावली मिळेल, अशा पद्धतीने नियोजन असेल.

उद्यानांचे संवर्धन कमी खर्चात –
शहरातील जिमखाना उद्यान आणि जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान यांचे संवर्धन करण्यासाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. कमीत कमी खर्चामध्ये या दोन्ही उद्यानांचे रूप पालटले जाईल आणि त्यांचे योग्य प्रकारे जतन केले जाईल, असेही निरवडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles