मुंबई : टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात थरारक झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने या विजयासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला 20 ओव्हरध्ये 7 विकेट्स गमावून 246 धावांपर्यंतच पोहचता आलं.



