सावंतवाडी : डेरवण येथे दिनांक ४ मार्च २०२६, बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या डेरवण युथ गेम्स २०२६ अंतर्गत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोहमने उत्कृष्ट कामगिरी करत सहावा क्रमांक पटकावला.
१६ वर्षांखालील वयोगटात झालेल्या या स्पर्धेत एकूण १०६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ७ फेऱ्या खेळल्या गेल्या असून सोहमने त्यापैकी ५.५ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल कु. सोहम देशमुख या विद्यार्थ्याला १००० रुपये रोख बक्षीस तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोहमच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील कु. सोहम देशमुख यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



