कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवाच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन. ; समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन.

सावंतवाडी : कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार पडत आहे. यानिमित्ताने कलाकारांमधील लपलेल्या दिग्दर्शकाला एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान या स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.व तुमची फिल्म मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
कोकण नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष रोहित पाळनी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा – 85540823884 , 8149375813 , 7798183359

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles