‘संघर्ष, जिद्द अन् लोकसेवेचा ध्यास’ असा त्रिवेणी संगम – आमदार निलेश राणे. ; वाढदिवसानिमित्त विशेष संपादकीय लेख.

✍️रुपेश पाटील.
राजकारणाच्या विस्तीर्ण आकाशात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचा प्रवास हा केवळ पद-प्रतिष्ठेचा नसतो, तर संघर्ष, जिद्द आणि लोकसेवेच्या निखाऱ्यावर घडलेला असतो. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे हे असेच एक ठसठशीत आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व.

संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, पण त्यांनी त्याला कधीही अडथळा मानला नाही; उलट त्या संघर्षालाच त्यांनी आपल्या यशाची शिडी बनवली. राजकीय परंपरेची पार्श्वभूमी लाभली असली, तरी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वतःला झोकून दिले. ‘मतदारसंघातील विकासकामे, पायाभूत सुविधा, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका’ या सर्वांमुळे त्यांची ओळख केवळ नेता म्हणून नव्हे, तर “संघर्षयात्री” म्हणून निर्माण झाली आहे. राजकारणाच्या गर्द वाटेवर चालताना अनेकांना पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळते; पण जनतेच्या मनात घर करणारे नेते फार थोडे असतात. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे अशाच नेत्यांपैकी एक. त्यांच्या प्रवासात संघर्ष आहे, जिद्द आहे, अपार मेहनत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेबद्दलची खरी आस्था आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात धडाडी आहे, निर्णयक्षमतेची ताकद आहे आणि जनतेशी असलेले नातं हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून  लोकांच्या अडचणी ऐकताना ते प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर ‘घरातील माणूस’ म्हणून उभे राहतात, हीच त्यांची खरी ताकद.

नागपूर अधिवेशन असो की मुंबई. या राजधानी आणि उपराजधानीच्या दोन्ही अधिवेशनांमध्ये कोकणचा हा ढाण्या वाघ अक्षरश: अभ्यासपूर्णरित्या धडाडला. केवळ प्रश्न मांडून थांबला नाही तर जनतेच्या न्याय आणि हक्कांसाठी शासनाशी अभ्यासपूर्ण भांडला देखील. आणि अत्यंत पोट तिडकेने कोकणच्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून अवघ्या महाराष्ट्राला नारायणराव राणे यांचा डीएनए काय असू शकतो, हे दाखवून देणारा कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या रूपाने सर्वांनी अनुभवला. खासदारकीचा अनुभव आणि नारायणराव राणे साहेबांचे बाळकडू अनुभवल्यामुळे आमदार निलेश राणे दिवसागणित बहरत आहेत. ते केवळ बहरत नाहीत तर हा वटवृक्ष कोकणच्या जनतेच्या न्याय हक्कांसाठी झिजत आहे.

वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तो मागे वळून पाहण्याचा, केलेल्या कार्याचा आढावा घेण्याचा आणि पुढील ध्येयांची नवी दिशा ठरवण्याचा क्षण असतो. या निमित्ताने त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याला जनतेचा विश्वास लाभला असून, भविष्यातही त्यांच्या नेतृत्वातून कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासाच्या नव्या उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संघर्षातून घडलेला नेता, जिद्दीने उभा राहिलेला प्रवास आणि लोकसेवेची अखंड धग  या सर्वांचा संगम म्हणजे आमदार निलेश राणे आहेत.

त्यांना आमच्या सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज परिवारातर्वा ढदिवसानिमित्त हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

आमदार निलेश राणे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या वाटचालीस नवी उर्जा लाभो, हीच सदिच्छा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles