जखमी अवस्थेतील भारद्वाज पक्ष्याच्या उपचारासाठी आशिष सुभेदारांची कार्यतत्परता.

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचा पक्षी म्हणून ओळख असलेला भारद्वाज पक्षी मंगळवारी न्यू खासकीलवाडा येथे जखमी अवस्थेत आढळून आला. याबाबत उबाठाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिले.
न्यू खासकीलवाड्यातील रहिवासी वेलेरियन फुडतडू यांना हा भारद्वाज पक्षी आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती उबाठा ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना दिली. श्री. सुभेदार यांनी तात्काळ याची दखल घेत वनविभागाला पाचारण केले. जखमी असलेल्या भारद्वाज पक्षीला वनविभागाचे कर्मचारी यांनी दखल घेत पुढील उपचारासाठी नेले. वनरक्षक श्री. अमृतकर आणि श्री. फाटक यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत भारद्वाज पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत तत्परता दाखविली याबद्दल युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles