माणगावच्या त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा उद्या २०० वा कार्यक्रम तेलंगणा राज्यात.

कुडाळ : माणगाव येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा २०० वा गीत रामायणाचा कार्यक्रम गुरुवारी १९ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत तेलंगणा राज्यातील निजामाबाद गाजुलपेठे ब्रह्मपुरीतील श्री बडाराम मठात होणार आहे.
तेलंगणा ब्रह्मपुरीतील श्री बडाराम मठात श्रीराम नवमीनिमित्त नऊ दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन पहिल्याच दिवशी गुरुवारी कै ग. दि. माडगूळकर रचित व मूळ गायक व संगीतकार कै सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या गीत रामायणाच्या काही निवडक गीतांचे सादरीकरण श्री राजाराम गव्हाणकर व त्यांचे सहकारी प्रमोद मुंडे, संतोष परब, तसेच बेलापूर नवी मुंबईचे केंद्र संचालक गोपाळ पाटील, नवी मुंबईचे नागनाथ पाटील हे कार्यक्रम सादर करणार आहेत.
श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने यापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), विठ्ठल मंदिर (पंढरपूर), श्रीक्षेत्र (नृसिंहवाडी), श्रीराम मंदिर (चाफळ) तसेच सज्जनगड आणि गोवा राज्यात देखील आपले कार्यक्रम सादर केले आहे.
श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा १९९ वा गीत रामायण गायनाचा कार्यक्रम तेर्सेबांबर्डे येथे राजाराम पांडुरंग गव्हाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. सदर कार्यक्रमासाठी गायन व हार्मोनियम वादन राजाराम गव्हाणकर, तबला साथ प्रमोद मुंडे ,निवेदक संतोष परब, ताल साथ बालकलाकार विर आडसरे आणि कोरस म्हणून सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांना साथ दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles