सोशल मीडियावरील पोस्टवरून धमकी प्रकरण. ; सुशील चौगुले यांची पोलिसांत तक्रार दाखल.

सावंतवाडी : तालुक्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
माजगाव (ता. सावंतवाडी) येथील रहिवासी सुशील रुपाजी चोगुले यांनी ही तक्रार दिली असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट प्रसारित करण्यात आल्या. तसेच अज्ञात इसमाकडून मोबाईलवरून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीत संबंधित इसमाचे नाव संजय गावडे (रा. वेंगुर्ला) असे नमूद करण्यात आले असून, या प्रकारामुळे भविष्यात स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 248, 356 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
सदर तक्रार अर्जावरून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, घटनेची सत्यता तपासल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles