आरोंदा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील जाधववाडीतील रहिवासी नारायण तुकाराम जाधव (वय ७८) यांनी आज सकाळी सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हृदयरोग व मधुमेह या सततच्या आजाराला कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरातील लोट्यावरील छपराच्या वासाला गळफास लावून जीवन संपविल्याचे समजते.
याबाबतची माहिती सद्गुरु कृष्णा जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय अरवारी (आरोंदा दूरक्षेत्र) करीत आहेत.
घटनास्थळी पीएसआय प्रमोद पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली, तर रुग्णालयात पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles