कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार, सिंधुदुर्गतर्फे जैन मंदिर, बोर्डवे (ता. कणकवली) येथे आयोजित २६ वे स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा उद्या दिनांक ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम बोअरवेल्सचे मालक अजित आप्पासाहेब पाटील असणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जैन इतिहास व पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर (गोवा) हे उपस्थित राहतील. यावेळी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अल्पोपहारानंतर भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर स्नेहसंमेलन, पाहुण्यांचे स्वागत, मान्यवरांचा सत्कार तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारनंतर महिलांसाठी व मुलांसाठी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात येतील. महाप्रसादासाठी श्री. श्रीधर (बाळासाहेब) महादेव डोळे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली) यांचे सहकार्य लाभणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. दीपक मधुकर तुपकर, कार्यवाह दीपराज गुरुदत्त बिजीतकर, उपाध्यक्ष रविंद्र कृष्णा पोकळे, सहसचिव राजाराम दिगंबर दंताळ, खजिनदार महावीर मनोहर मांगले, महिला अध्यक्षा दीपिका दीपराज बिजीतकर,सदस्य साहील श्रीधर डोर्ले, संजय रमेश मुधाळे, नितीन काशिनाथ जठार, महावीर (सचिन) बळवंत साळवी तसेच महिला सदस्य श्रीमती पद्मा पार्श्वनाथ बोगार व श्रीमती अपर्णा अशोक साळवी, तसेच सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रीधर (बाळासाहेब) महादेव डोर्ले, उपाध्यक्ष अशोक भास्कर ठोंबरे व दयानंद यशवंत मांगले, सचिव विराणा बापू साळवी तसेच सदस्य भरत धनपाल पाटील यांसह जैन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार व जैन महिला मंडळाने विशेष परिश्रम घेत आहे.



