सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित राज्यस्तरीय हिंदी शिक्षक संमेलन व पुरस्कार वितरण समारंभ 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या हिंदी शिक्षिका श्रीम.शारदा घनश्याम गावडे यांना आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाविषयी निर्माण करण्यासाठी घेतलेले परिश्रम याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



