प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठरला आदर्शवत अन् प्रेरणादायी!

वेंगुर्ला : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडी यांचा विविध उपक्रमांनीयुक्त असा ‘मायेची हाक, प्रेमाची साथ’ अर्थात ‘वसा दातृत्वाचा व वेशभूषा स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव होते.  या कार्यक्रमाला तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर,  राज्यपदाधिकारी सचिन मदने तसेच जुनी पेन्शन संघटना राज्यपदाधिकारी राजू वजराटकर व कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी. चिटणीस कर्पूरगौर जाधव आदि उपस्थित होते. तसेच तालुका पदाधिकारी सचिव रामा पोळजी, शिक्षक नेते सीताराम नाईक, वेंगुर्ला शिक्षक पतपेढी संचालक सीताराम लांबर महिला आघाडी अध्यक्षा श्रीम. ऋतिका राऊळ, सचिव श्रीम. सरोज जानकर, शिक्षक नेत्या श्रीम. नेहा गावडे, सल्लागार श्री. त्र्यंबक ऊर्फ भाऊ आजगावकर, एकनाथ जानकर, श्रीम.प्रतिमा पेडणेकर, श्रीम.देवयानी आजगावकर उपस्थित होते.तसेच तालुक्यातील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना, आजच्या युगात महिलांनी शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. तसेच महिलांनी स्वावलंबी बनून समाजाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वसा दातृत्वाचा या उपक्रमांतर्गत कु. रितिका प्रकाश गोसावी. रा. होडावडे या आई -वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला आर्थिक मदत म्हणून संघटनेमार्फत धनादेश देण्यात आला. तसेच अपंगत्वावर मात करत क्रिकेट या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्रीम. स्मिता गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींनीसाठी तीन गटांत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक- कु. आध्या ललित खापरे (वेंगुर्ले नं. 1), द्वितीय क्रमांक-कु कनिका कुणाल इंदुलकर (शिवाजी प्रागतिक), तर तृतीय क्रमांक- कु.परी नितीन सडवेलकर(राणी लक्ष्मीबाई) यांनी पटकाविला. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटात प्रथम क्रमांक- कु. सान्वी सहदेव परब (परबवाडा नं.1 ), द्वितीय क्रमांक कु. स्वरा सत्यवान बरकुटे( मातोंड पेंढऱ्याचीवाडी),तर तृतीय क्रमांक कु. प्रांजल रुपेश नार्वेकर ( उभादांडा नं. 3) यांनी पटकाविला. इयत्ता सहावी ते सातवीच्या गटात प्रथम क्रमांक कु. श्रुती दिनार मराठे (मठ नं.2), द्वितीय क्रमांक कु. हर्षिता सतीश मुळीक ( परबवाडा नं.1) तर तृतीय क्रमांक कु. गायत्री दत्तप्रसाद कावले( मठ नं 2) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण श्रीम. खानोलकर मॅडम, श्रीम. तेरसे मॅडम, श्रीम. शितोळे मॅडम, श्रीम. मार्गी मॅडम, श्री.कर्पूरगौर जाधव सर व श्री. देसाई सर यांनी केले.
तसेच रामचंद्र( भाऊ) कोनकर (विस्तार अधिकारी, वेंगुर्ला), श्रीम. उर्मिला वेंगुर्लेकर ( मुख्याध्यापिका वेंगुर्ले नं. 2), व श्री. उदय साळकर ( मुख्याध्यापक शाळा दाभोस) यांच्या यशस्वी सेवापूर्तीसाठी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. योगिता सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम. राशी पोळजी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, महिला व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles