कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने भरगच्च उपक्रमांचे आयोजन. ; शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती.

सावंतवाडी : कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांसह रूग्णांना फळ वाटप, धान्य वाटप, वृक्ष वाटपासह अनाथाश्रमांना देखील सामाजिक भावनेतून मदतीचा हात दिला जाणार आहे.

दरम्यान, महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रम तसेच लहान मुलांसाठी, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पत्रकार भगिनींचा सन्मान, महिला किर्तनकारांसह विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच पाककला स्पर्धेसह विविध उपक्रम आम्ही राबविणार आहोत अशी माहिती महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सचिव परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles