सहवेदना – उत्तम उर्फ मुन्ना सुभेदार यांचं दुःखद निधन.

सावंतवाडी : शहरातील चितार आळी येथील रहिवासी उत्तम रमाकांत सुभेदार उर्फ मुन्ना सुभेदार (वय ५८) यांचे काल रात्री १० वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. कळसुलकर हायस्कूलचे एक आदर्श क्रीडापटू म्हणून त्यांची ख्याती होती.
उत्कृष्ट कब्बडी, खो – खो पटू म्हणून त्यांनी मैदाने गाजवली आहेत.
सावंतवाडी शहर आणि परिसरात ते मुन्ना नावाने ओळखले जात असत
क्रिकेटमधील एक उत्कृष्ट विकेटकिपर व चित्याची चपळाई असलेले क्रिकेट खेळाडू म्हणून देखील ते परिचित आहेत.
दरम्यान, त्यांच्या निधनाने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून हळूहळू व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles