प्रोटोकॉल म्हणजे प्रोटोकॉलचं !, फक्त पदविका प्राप्त पत्रकारांनाच प्रवेश! ; बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना!, अध्यक्षपदी विजय जोशी तर उपाध्यक्षपदी श्रद्धा ठोंबरे, अनिकेत सोनवणे तर सचिव पदी अमित गायकवाड.

बदलापूर : बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेचा स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. स्थापना सोहळ्यानिमित्त प्रथम कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. या स्थापना सोहळ्याला राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे मान्यवर, राजकीय नेते आणि शहरातील समाजसेवक उद्योजक उपस्थित होते. बदलापूर शहरात डिजिटल माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यात येतात.

त्यासोबतच शहरातील उभारण्यात आलेले मोठमोठे प्रकल्प सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. शहरात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांना एकत्रित राहता यावं, यासाठी बदलापूर शहर डिजिटल मीडिया संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचा प्रथम प्रोटोकॉल म्हणजे पत्रकारिता पदविका प्राप्त झालेल्या पत्रकारांनाच या संघटनेत प्रवेश देण्यात आला आहे. डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना शहरात काम करणार आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, डिजिटल संपादक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने, राज्य संघटक मयूर गलांडे, मुंबई अध्यक्ष शशिकांत देशमुख यांच्यासह नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे, गटनेते शरद तेली, आरोग्य समिती सभापती किरण भोईर, भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते नगरसेवक उद्योजक समाजसेवक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी अजय जोशी, उपाध्यक्षपदी श्रद्धा ठोंबरे, अनिकेत सोनवणे, सचिव पदी अमित गायकवाड, खजिनदारपदी ऋतिकेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेत प्रमुख सल्लागार म्हणून रवींद्र थोरात आणि कैलास जाधव काम करणार आहेत. स्थापना सोहळ्यात आयोजित करण्यात आलेला पहिला उपक्रम म्हणून संघटनेतील सर्व सदस्यांचा पाच लाखांचा विमा काढण्यात आलाय. यापुढे सुद्धा संघटनेच्या माध्यमातून शहरात पत्रकारांसाठी मार्गदर्शन शिबिर, सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिर आणि विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष अजय जोशी यांनी त्यांच्या भाषणात दिली. तर आमच्या संघटनेचा प्रोटोकॉल आणि सर्व नियमावली ही कठोर असल्याची माहिती आभार प्रदर्शन करताना उपाध्यक्ष श्रद्धा ठोंबरे यांनी दिली. या संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण आणि सुवर्णक्षण बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेचे कॅमेरामन साहिल काळे आणि मंथन गायकवाड यांनी चित्रित केले. ज्यांना कुणाला या संघटनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, संघटनेच्या नियमावलीत बसणाऱ्या पत्रकारांनाच संघटनेत प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांशी चर्चा करताना दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles