एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा! ; सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले.

बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आलीय. सुरूवातीला बाचाबाची वरून प्रकरण धक्काबुक्की वर गेले. यामुळे शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले असून मतभेद असल्याचे समोर आलं आहे. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेल मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.

आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले –

ही बैठक नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचे उपस्थितीत आयोजीत केली होती. या बैठकीला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकरसह पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. काही माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रण नसल्याने बैठक सुरू असताना त्यांनी सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी केली तसेच नवनियुक्त संपर्क प्रमुख सोनार यांचा सत्कार करण्यास आजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे एका गटात असंतोष पसरल्याने आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले आणि शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे चव्हाट्यावर आले. महत्वाचे म्हणजे सेनेच्या एका गटाने माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बाचाबाची झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles