‘एनएफजीआयटीआयईए’च्या राष्ट्रीय महासचिवपदी अनिल भोसले यांची निवड! ; राष्ट्रीय अधिवेशनात गोवा प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या.

पणजी (गोवा) : नॅशनल फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट आयटीआय एम्प्लॉईज असोसिएशन्स (NFGITIEA) चे ४थे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड (पंजाब) येथे यशस्वीरित्या पार पडले. देशभरातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आयटीआय कर्मचारी व संस्थात्मक विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली. अधिवेशनादरम्यान झालेल्या निवडणुकीत अनिल भोसले यांची राष्ट्रीय महासचिव म्हणून निवड करण्यात आली.

गोव्याचे प्रतिनिधित्व करताना सिध्देश आसोलकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष भूपेश दळवी यांची राष्ट्रीय सचिव तसेच सय्यद बशीर यांची सल्लागार मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या मानाच्या पदांवरील निवड ही गोवा राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून राष्ट्रीय स्तरावर गोव्याचे वाढते योगदान अधोरेखित करते.

या अधिवेशनात विविध राज्यांकडून मांडण्यात आलेल्या समस्या व मागण्यांवर देखील चर्चा करण्यात आली. NCVT कायदा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून समान ग्रेड पे व पदनामाबाबत एकमत झाले.

अधिवेशनात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –

सर्व आयटीआयमध्ये शनिवारी साप्ताहिक सुट्टी लागू करावी

प्रशिक्षण अधिकाऱ्यांना ₹४६०० ग्रेड पे द्यावा

डीजीटी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी

प्रशिक्षण कालावधी (१२००/१६०० तास) याबाबत स्पष्टता आणावी

RPL/CITS परीक्षा घेऊन पात्र अधिकाऱ्यांचा समावेश करावा

संस्थांमध्ये संसाधने वाढवून संलग्नीकरण प्रक्रिया सुलभ करावी

अधिवेशनात या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून राष्ट्रीय स्तरावर सहकार्याचे आश्वासन देण्यात आले.

हा कार्यक्रम आयटीआय कर्मचाऱ्यांचा आवाज अधिक सक्षम करण्यासाठी तसेच व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात प्रगत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles