क्रिकेटच्या जल्लोषात न्हाऊन निघाले सावंतवाडी ! ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या दमदार उपस्थितीत ‘ओम स्पोर्ट्स’चा विजयघोष!

सावंतवाडी : शहरातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरलेली भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा तब्बल १७ दिवसांच्या रोमांचक लढतीनंतर थाटात पार पडली. एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे आणि सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साह, जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात रंगला.
या सोहळ्याचे आकर्षण ठरले ते भाजपाचे युवा, धडाडीचे नेते विशालजी परब, ज्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मानित करताना मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये नवचैतन्य संचारले. सोबत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.

‘ओम स्पोर्ट्स’चा दणदणीत विजय!
सावंतवाडी, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील तब्बल १६ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक सामना थरारक ठरत असताना अंतिम लढतीत सावंतवाडीच्या ‘ओम स्पोर्ट्स’ संघाने अप्रतिम खेळ करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तर ‘एबी इलेव्हन सावंतवाडी’ संघाने जोरदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.
🏆 विजेत्यांना १ लाख रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी,
🥈 उपविजेत्यांना ५० हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

🌟 युवा नेते विशाल परब यांचा प्रेरणादायी संदेश –
यावेळी युवा नेते विशाल परब यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळ हा केवळ मनोरंजन नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठाची संधी मिळते आणि भविष्यातील क्रीडातारे इथूनच घडतात.”
त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

मान्यवरांची उपस्थिती –
या सोहळ्यास केतन आजगांवकर, राजन नाईक, राजा राणे, बाबा रेडकर, रघू धारणकर, गुरू चिटणीस, संतोष केनवडेकर, शोएब बेग, धिरेंद्र म्हापसेकर, सुदेश नेवगी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles